आता शेतकऱ्यांचं सावकारी कर्जही माफ होणार, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा निर्णय

16 Mar 2020 , 05:02:42 PMमहाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर करुन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. त्याच धर्तीवर आता विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. जिल्ह्यातील ३८ हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार असून सावकरांकडून घेतलेले तब्बल ३७ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील, तर सरकारकडून त्या संबंधित सावकारांना रक्कम अदा केली जाईल, अशी माहिती पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रात नमूद केली आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे यापुढे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, हा विश्वास आहे.

संबंधित लेख