नवी मुंबईत सायबर गुन्हे लॅब उभारणार

16 Mar 2020 , 04:40:00 PMराज्यात सायबर गुन्हेगारीत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारमार्फत कोणत्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत, असा प्रश्न आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित करण्यात आला. यावेळी राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांनी सभागृहाला उत्तर देताना म्हणाले की, सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होतो, त्यासंदर्भातील विविध गुन्हेदेखील समोर आले आहेत. यावर नियंत्रण मिळण्यासाठी सरकारकडून नवी मुंबई येथे सायबर गुन्हे लॅब उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात सायबर गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असेही गृहमंत्री म्हणाले.

संबंधित लेख