संसदेत सात वेळा खोटे बोलल्याने ट्रम्प यांच्या मंत्र्याला तुरूंगवास, मोदीजी तुम्ही आणि तुमचे मंत्री तर नेहमीच जनतेची दिशाभूल करता, मग भारतात असं होऊ शकतं का ?

22 Feb 2020 , 05:14:28 PM


संसदेत तब्बल सातवेळा खोटी विधानं केल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी आणि सल्लागार रॉजर स्टोन यांना तेथील कोर्टाने तब्बल ४० महिन्यांचा तुरूंगवास आणि २० हजार डॉलरचा दंड ठोठावला. रॉजर यांनी अशी विधानं करून देशाची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. तर ट्रम्प यांनी रॉजर यांच्या चुकीच्या राजकारणामुळे त्यांना शिक्षा झाल्याचे म्हटले आहे. असे भारतातही होऊ शकेल काय...? कारण भाजपाचे अनेक मंत्री सातत्याने वाचाळ बडबड करून जनतेवर खोट्याचा मारा करत आहेत. ट्रम्प यांचे मित्र भारताचे पंतप्रधान मोदी यांनीही आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात संसदेत केलेल्या विविध विधानांद्वारे जनतेची अनेकदा दिशाभूलच झाली आहे. त्यामुळे अशा या भाजपावाल्यांचे काय करायचे...? अमेरिकेसारखे भारतात होऊ शकते काय..? या वाचाळवीरांना आवरण्यासाठी काय दंड करायचा..? असे सवाल आता तमाम भारतीय करत आहेत.

संबंधित लेख