नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे? आतापर्यंत १५ देशांचे पंतप्रधान,राष्ट्राध्यक्षांचा अहमदाबाद दौरा.

20 Feb 2020 , 06:34:24 PM


नरेंद्र मोदी नेमके देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. आतापर्यंत तब्बल १५ देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांनी अहमदाबाद आणि गुजरातचा दौरा केलाय. यात चीन, जपान, फ्रान्स, कॅनडा अशा अनेक देशातील प्रमुखांचा समावेश आहे. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात येत आहेत, त्यांनाही अहमदाबादला नेण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी अहमदाबाद येथे अवास्तव खर्च सुरू आहे, तिथली गरिबी झाकण्यासाठी भिंत बांधून रस्त्यातील झोपडपट्टी लपवण्याचीही तयारी झाली आहे. भारत म्हणजे फक्त गुजरात नाही, मग कोणत्याही परदेशी नेत्यांच्या दौऱ्यांमध्ये फक्त गुजरातची टिमकी का वाजवली जाते?

संबंधित लेख