आणखी एका भाजपा आमदारावर सामुहिक बलात्काराचा गुन्हा,केंद्र सरकार तरीही झोपलेले?

20 Feb 2020 , 03:35:48 PM

देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा युपीचा भाजपाचा माजी आमदार कुलदीप सेंगर अजूनही विस्मरणात गेलेला नाही. त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. इतके होऊनही भाजपा नेत्यांनी निर्लज्जपणा काही सोडलेला नाही. युपीच्याच भदोही येथील भाजपा आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी याच्यासहीत त्याच्या कुटुंबातील सहा जणांवर एका महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महीलेवर कित्येक महीने त्रिपाठी आणि त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी बलात्कार केला. त्यातून जेव्हा ती गर्भवती राहिली तेव्हा तिला गर्भपात करायला लावला. सातत्याने होणाऱ्या लैंगिक शोषणाला कंटाळून अखेर पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतल्याचे पीडितेने सांगितले. सेंगर दोषी असूनही भाजपाने त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. आता यालाही संरक्षण देणार की, त्याच्यावर कठोर कारवाई करणार असा सवाल प्रत्येक सुजाण नागरीक सरकारला विचारत आहे.

संबंधित लेख