मुंबई शहर हे कलेचा खजिना – मा. शरद पवार

13 Feb 2016 , 04:54:14 PM

देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबईची ओळख आहेच पण आज मुंबई शहर हे कलेचा खजिना आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार यांनी मुंबई शहराचा गौरव केला. 'दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या' नव्या इमारतीचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत झाले, त्यावेळी मा. शरद पवार बोलत होते. आज मुंबई आणि राज्यभरातून इथे येणारे कलाकार कलेच्या माध्यमातून देशासाठी देत असलेले योगदान बहुमूल्य आहे. या कलाकारांमुळेच महाराष्ट्राची पर्यायाने देशाची पताका राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलाने फडकत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता व सांस्कृतिक आणि उच्च शिक्षण विभागमंत्री विनेद तावडे उपस्थित होते. 

द बॉम्बे आर्ट सोसायटीचा आतापर्यंतचा इतिहास आणि गौरवशाली परंपरा मांडणारी फिल्म कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आली. त्यानंतर ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी हिस्ट्री अँड व्हॉयेज’ आणि ‘मास्टर्स ऑफ द इंडियन आर्ट’ या दोन पुस्तिकांचे प्रकाशनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. द बॉम्बे आर्ट सोसायटीची रचना क्युबिकल असून यामध्ये तीन प्रदर्शनी स्थळ, एक प्रेक्षकगृह आणि ग्रंथालय यांचा समावेश आहे.  

संबंधित लेख