मागील फडणवीस सरकारची जाहीरातींसाठी कोटीच्या कोटी उड्डाणे, पाच वर्षांत तब्बल १५ कोटी रुपयांचा जाहिरातींवर चुराडा

19 Feb 2020 , 02:24:27 PM


देवेंद्र फडणवीस यांचा कारभार म्हणजे आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून असा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेला वायफळ खर्च आता उघड झालाय. आपल्या वाढदिवशी बॅनर्स, पोस्टर्स इत्यादीवर होणारा वायफळ खर्च टाळून आणि तो पैसा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या, असं म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या काळात सरकारी तिजोरीतून पाच वर्षांत १५ कोटी ५१ लाख रुपयांचा जाहिरातींवर चुराडा करण्यात आलाय. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली आहे. यात फडणवीस सरकारने २०१७-१८ या वर्षात सर्वाधिक पैसे खर्च असून टीव्ही वाहिन्यांवरील जाहिरातींवर तब्बल ५,९९,९७,५२० तर रेडिओ जाहिरातींवर १,२०,६९,८७७ रुपयांचा खर्च केल्याचे उघड झालेय. ही रक्कम इतकी मोठी आहे की, या पैशातून राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळू शकला असता. पण, प्रसिद्धीच्या लालसेपोटी फडणवीस आणि भाजपा सरकारने अनागोंदी कारभार केला आणि राज्यातील जनतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले

संबंधित लेख