बेरोजगारीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक

19 Jun 2019 , 07:57:39 PM

वाढत्या बेरोजगारीला कमी करण्यात राज्य व केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याच्या निषेधार्थ पुणे विभागीय राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून आज पुण्यातील रोजगार नोंदणी कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. केंद्र व राज्य सरकारचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीची धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारला रोजगार निर्माण करता आलेले नाहीत. यामुळे बेरोजगारी वाढली आहे, युवकांना शिक्षण घेऊनही रोजगार नाही. जिल्हा मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवस्थित माहिती दिली जात नाही. ऑनलाईन अर्ज किचकट पद्धतीचा आहे, रोजगार कार्ड काढून काही उपयोग नाही, नवीन उद्योजकांना कोणतेही सहकार्य मिळत नाही, फक्त कौशल्य विकास करून रोजगारच नसेल तर कार्यालय तरी कशासाठी चालू ठेवायचे? त्यामुळे याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आणि रविकांत वरपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हे टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी पुणे शहराध्यक्ष राकेश कामठे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, पिंपरी चिंचवड अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिणीस अभिषेक बोके,मनोज पाचपुते,किशोर कांबळे, अमोल ननावरे, विशाल नाटेकर ,महेश हांडे,अच्युत लांडगे आदी उपस्थित होते.

संबंधित लेख