राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 20 वा वर्धापन दिन!

10 Jun 2019 , 06:22:35 PM

आजचा दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे. याच दिवशी वीस वर्षांपूर्वी षण्मुखानंद हॉलमध्ये पक्षस्थापनेची घोषणा केली होती. आपला पक्ष आज २१व्या वर्षात पदार्पण करत आहे. आपण अनेक वर्षे राज्यात सत्ता उपभोगली आणि अनेक महत्त्वाची पदे भूषविले. लोकांचे प्रेम आपल्यावर आहेच.. पण याला तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची साथ मिळाली. हा पक्ष तुमच्यामुळे उभा आहे, अशा भावना उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यक्त केल्या.

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने आज जलसंकल्पाचा आगळा-वेगळा कार्यक्रम घेतला त्याबाबत मी त्यांचे अभिनंदन करतो, पाण्याची जाण सर्वांनाच झालीच पाहिजे, हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आपण झटूया, असे आवाहनही पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आ. हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष सचिन अहीर,ज्येष्ठ नेते माजिद मेमन, आमदार बाबाजानी दुर्रानी, आ. प्रकाश गजभिये, ख्वाजा बैग, किरण पावसकर, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी आमदार अशोक धात्रक, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई अध्यक्ष युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई अध्यक्ष अमोल मातेले आणि पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख