विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय लाभ उठविण्याचा सरकारचा डाव?

05 Jun 2019 , 09:12:15 PM

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या तेलंगणा राज्याला कर्जमाफी आणि मोफत वीज मिळते. मात्र, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागते, अशी दुदैवी परिस्थिती राज्यातल्या शेतकऱ्यावर ओढावली आहे. तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मोफत वीज द्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच केली होती. मात्र, झोपेचं सोंग घेणाऱ्या या सरकारने त्यावेळी कोणतीच ठोस पाऊले उचलली नव्हती. आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र शेतकऱ्यांना मोफत वीजेची भेट देऊन राजकीय लाभ उठविण्याचा विचार फडणवीस सरकार करत आहे. मुळात या सरकारने महाराष्ट्रात कर्जमाफीची घोषणा होऊनही त्याची नीट अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे ही मोफत वीज हीदेखील फसवी घोषणाच ठरणार का?

संबंधित लेख