पराभवाने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं – अजित पवार

01 Jun 2019 , 06:23:43 PM

कोणत्याही परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वतःचे एक अस्तित्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे अस्तित्व कायम ठेवणार. अशा अफवांना कार्यकर्त्यांनी बळी पडता कामा नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मुंबई येथे आयोजित सर्वसाधारण बैठकीत केले. जनता लोकसभेला वेगळा विचार करत असते आणि विधानसभेला वेगळा विचार करत असते. महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकीत लोक वेगळा विचार करतील आणि या सरकारला खाली खेचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पराभव हा पराभव असतो पण त्याने खचून जायचं नसतं, पुन्हा लढायचं असतं, असेही पवार म्हणाले.

संबंधित लेख