राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ नंदूरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

12 Feb 2016 , 06:25:45 PM

नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथे 'शुध्द पेयजल अभियानाचा' शुभारंभ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी शहादा येथील जनतेसाठी १४,५०० रूपयांचे वॉटर प्युरीफाईंग मशीन निम्म्या किंमतीत उपलब्ध करुन दिले आहेत. पिण्याचे शुद्ध पाणी मिळवण्यासाठी लोकांना स्वस्त पर्याय उपलब्ध असावेत हा यामागील हेतू आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आपल्या हस्ते व्हावा याबद्दल चित्रा वाघ यांनी आनंद व्यक्त केला. 

याबरोबरच नवापूर येथे नंदूरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटनही चित्राताईंनी केले. यावेळी त्यांनी स्वतः फलंदाजीही केली. युवक जिल्हाध्यक्ष सागर तांबोळी याने फेकलेला चेंडू राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, महिला जिल्हाध्यक्ष हेमलता शितोळे यांच्या सोबतीने टोलावण्याची मजा काही औरच होती, अशी प्रतिक्रिया चित्राताईंनी दिली. 


संबंधित लेख