अध्यक्ष खा. शरद पवार यांचे दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

16 May 2019 , 03:47:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी नुकताच दुष्काळी दौरा करत सोलापूर, अहमदनगर व बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त गावांना, पाण्याअभावी सुकलेल्या फळबागांना व चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली.
ग्रामस्थांची कैफियत व समस्या विस्तृत पत्राद्वारे मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्याकडे पवार साहेबांनी मांडल्या आहेत. मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री व सचिवांसह तातडीने बैठक आयोजित करून दुष्काळग्रस्त प्रतिनिधींसह भेटीची अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

संबंधित लेख