राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर...

14 Mar 2019 , 07:21:19 PM

राष्ट्रवादीने आज १२ जागा केल्या जाहीर...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

कॉंग्रेस पक्षाने बुधवारी आपली यादी जाहीर केली होती त्यामध्ये महाराष्ट्रातील ५ जणांचा समावेश होता आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

ही यादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज जाहीर केली.यामध्ये रायगड- सुनिल तटकरे, बारामती - सुप्रियाताई सुळे, सातारा- उदयनराजे भोसले, कोल्हापूर- धनंजय महाडिक, बुलढाणा- राजेंद्र शिंगणे, जळगाव- गुलाबराव देवकर, परभणी- राजेश वीटेकर, मुंबई उत्तर पुर्व- संजय दिना पाटील, ठाणे - आनंद परांजपे , कल्याण- बाबाजी पाटील,लक्षद्वीप- मोहम्मद फैजल, तर हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठींबा दिला आहे आणि उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि परवा जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.

बीड, अहमदनगर उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हीसुद्धा नावे जाहीर केली जातील असेही आमदार जयंतराव पाटील यांनी सांगितले.

गडाख यांची उमेदवारी जाहीर करुन काम केले होते. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वडीलांचा पराभव केला होता. ही जुनी घटना पवार साहेबांनी सांगितली. त्यामुळे पवारसाहेबांनी कुणाचा अपमान केलेला नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले उपस्थित होते.

संबंधित लेख