खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ सेवालाल महाराज यांची जयंती संपन्न

26 Feb 2019 , 07:51:18 PM

बंजारा भटक्या समाजाचे मार्गदर्शक संत सेवालाल महाराज यांच्या 282 व्या जयंतीनिमित्त बारामती येथे खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अबिवादन करण्यात आले. पवार यांनी बंजारा भटक्या-विमुक्तांना याप्रसंगी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भटक्या विमुक्त सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड,बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम मुंडे व सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भटक्या-विमुक्तांच्या वतीने पवार यांना बंजारा राजस्थानी पगडी ,तलवार व पारंपारिक पट्टा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. 

संबंधित लेख