मुख्यमंत्र्यांच्या वाहनानं ११ वेळा वाहतूक नियम तोडले

13 Dec 2018 , 10:47:24 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनाने गेल्या ८ महिन्यांत ११ वेळेस वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं आहे. माहिती अधिकारानुसार केलेल्या मागणीवर वाहतूक पोलिसांनीच दिलेल्या उत्तरातून हे स्पष्ट झालंय. १२ जानेवारी ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या या नियमांच्या उल्लंघनासाठी मुख्यमंत्र्यांना १३ हजारांचा दंड भरावा लागला असता. पण, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभाराची ग्वाही देणाऱ्या व्हीआयपी मुख्यमंत्र्यांवर काहीच कारवाई झाली नाही. उलट, ही चलान रद्द करण्यात आली.

संबंधित लेख