मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा केअर सेंटर गेलं कुठे?

08 Dec 2018 , 10:14:05 PM

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात घडलाच, तर जखमींना तातडीने उपचार मिळत नाहीत. त्यामुळे एक ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची घोषणा जून २०१६ मध्ये फडणवीस सरकारमधील दोन ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे आणि दिवाकर रावते यांनी केली होती. पण, हे ट्रॉमा केअर सेंटर अजूनही प्रत्यक्षात आलेलेच नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातले पैसे खर्चून बांधलेल्या ६ खोल्या धूळ खात पडल्या आहेत. आणिबाणीच्या वेळी संपर्कासाठीचं दूरध्वनी केंद्रही बंदच आहे. मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि पुढे काहीच करायचं नाही, हा फडणवीस सरकारचा खाक्याच आहे.

संबंधित लेख