चर्चा नको, अहवाल सादर करा - आ. अजित पवार

23 Nov 2018 , 08:43:39 PM

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल सादर होत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही अशी भूमिका विधानसभेत विरोधी पक्षांनी जाहीर केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवारयांनी माध्यमांशी बोलताना दिली. सरकार वेळकाढूपणा करत आहे, संभ्रम निर्माण करत आहे, आरक्षणाच्या प्रश्नावर पळपुटेपणा करत आहे, अधिवेशनात कमी दिवस काम कसे करता येईल, याचा प्रयत्न सरकार करत आहे, असा आरोप त्यांनी केला. सरकार कामकाज रेटून नेत असून सभागृहात गोंधळ सुरू असताना सरकार विधेयके काढत आहे, असा कारभार कधी पाहिला नाही, हे दुर्दैवी आहे, असेही ते म्हणाले. लोकांना आपण काय उत्तर द्यायचं याचा विचार सरकार करत नाही. सरकारने पुढील सोमवारी कामकाज पुन्हा सुरू होताच अहवाल सादर करावा, असे पवार यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख