सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात सर्वपक्षीय विरोधक युवकांची एकी

16 Nov 2018 , 11:43:55 PM

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांतील युवा नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच, विरोधीपक्षांच्या पुढील रणनितीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. सत्ताधारी पक्षाच्या भोंगळ आणि हुकूमशाही कारभाराविरोधात आवाज उठायचाच असा निर्धार या बैठकीत युवकांनी केला. येत्या काळात सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात व्यापक स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, अशी माहिती धीरज शर्मा यांनी दिली.

यावेळी काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रविकांत वरपे,  युवक उपाध्यक्ष शैलेश मोहिते, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष निलेश भोसले, युवक सरचिटणीस सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख