राष्ट्रवादी डॉक्टर सेल व सामाजिक न्याय विभाग यांच्यातर्फे मोफत सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन

19 Oct 2018 , 08:11:38 PM

राष्ट्रवादी डॉक्टर सेल व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ  यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गंजमाल येथील भीमवाडी येथे या शिबिरादरम्यान मोफत औषधे वाटप करण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष धनंजय निकाळे, सरचिटणीस संजय खैरनार व डॉ. भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच धन्वंतरी पूजन राष्ट्रवादी डॉक्टर सेल शहराध्यक्ष डॉ. अमोल वाजे यांनी केले. या मोफत शिबिराचा  १७०० रुग्णांनी लाभ घेतला.

या शिबिरात तज्ञ डॉक्टर डॉ श्यामकांत पाटील, डॉ सचिन शिंदे, डॉ सौरभ मिसर,डॉ सोनल पाटील ,डॉ पुनम गोसावी ,डॉ शैवी शर्मा ,डॉ अवनिश पाठक ,डॉ मोहन राजपूत, डॉ प्रीतम कळवनकर,डॉ विश्वजित शिंदे ,डॉ विशाल जरारे आदींचे सहकार्य लाभले .


संबंधित लेख