जागतिक लोकशाही दिन चिरायू होवो !!!

15 Sep 2018 , 07:46:11 PM

जागतिक लोकशाही दिन साजरा करताना जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशासमोरची सध्याची नवी आव्हाने दुर्लक्षून चालणार नाही. आज देशातील सत्ताधाऱ्यांकडूनच लोकशाही मूल्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. संविधानाची होळी, निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव, ईव्हीएमचे सावट, धार्मिक विसंवाद, झुंडशाही, माध्यमांची मुस्कटदाबी, एकचालुकानुवर्तित्व, पुरोगाम्यांचे हत्यासत्र, न्यायालयीन व्यवस्थेत हस्तक्षेप अशा अनेक आव्हानांना देशाची लोकशाही आणि नागरिक सामोरे जात आहेत. त्यामुळे यापुढे आपल्या हक्क आणि अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देशाच्या सूज्ञ नागरिकांनी वेळीच जागे होण्याची गरज आहे.

 

जागो मतदार! जागो!!
जागतिक लोकशाही दिन चिरायू होवो !!!

 


संबंधित लेख