मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादीचे ठिय्या अंदोलन

08 Sep 2018 , 11:44:30 PM

पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार राम कदम यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याला तब्बल ५ दिवस उलटून गेले. तरीही मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया येत नाही. स्वतः मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु कोणतीही हालचाल मुख्यमंत्र्यांकडून होत नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र निषेध केला.

बेटी पढाओ बेटी बचाओचे जुमले देणाऱ्या या सरकारला महिलांच्या संरक्षणाचे काहीच पडलेले नाही. याचा निषेध पुण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून करण्यात आला. नारायणपूर तालुका पुरंदर येथे झालेल्या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा वैशालीताई नागवडे, तालुकाध्यक्षा गौरी कुंजीर, लोचन शिवले, ज्योती धुरंगे, वंदना जगताप, रोहिणी राऊत, प्रभावती सुरवसे व इतर कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

संबंधित लेख