इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

07 Sep 2018 , 06:15:31 PM

देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी येत्या १० सप्टेंबर रोजी एकदिवसीय भारत बंदचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा या बंदला पाठिंबा असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण ताकदीने या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

देशात पेट्रेल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, चाकरमानी, शेतकरी अशा सर्वांनाच पोहोचली असून राज्यातील कानाकोपऱ्यात वारंवार निषेध व्यक्त केला जात आहे. सरकार मात्र याची कुठेही दखल घेताना दिसत नाही. भाजप-शिवसेना सरकार कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाही, असे जयंत पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.

संबंधित लेख