राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अहमदनगर येथील मोर्चाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

03 Feb 2016 , 06:09:57 PM

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज अहमदगर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्कमाफी मिळावी या मागणीसाठी राज्यभरात राष्ट्रवादीचे आंदोलन सुरू आहे.

या मोर्चामध्ये मांडण्यात आलेल्या मागण्या – 
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे. 
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीआड येणाऱ्या जाचक अटी दूर व्हाव्या.
ओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा वाढवावी.
विद्यार्थ्यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम दोन महिन्यांत व्हावे. 
आदिवासी वसतीगृहांची क्षमता वाढवावी.
अभियांत्रिकी, मेडिकल, डेंटल, बी.एच.एम.एस, तसंच १६८ कृषी महाविद्यालयांच्या ७० कोटींहून अधिक रकमेच्या प्रलंबित शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जावा.
पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र अहमदनगर येथे लवकरात लवकर सुरु व्हावे.  

इत्यादी मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

संबंधित लेख