बांगलादेशी निर्वासितांना हद्दपार करण्याच्या सरकारच्या प्रक्रियेवर नवाब मलिक यांनी केले भाष्य

02 Aug 2018 , 11:20:03 PM

या देशात कोणीही बेकायदेशीररित्या राहू शकत नाही हा कायदा आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रातही प्रक्रिया सुरु आहे. आरटीआयकडून बांग्लादेशच्या निर्वासितांचे आकडे आले आहेत. युपीआयच्या काळात ५५०० जनतेला निर्वासित करण्यात आले होते. परंतु गेल्या चार वर्षात भाजप सरकारच्या काळात एकूण हजार सुद्धा हद्दपार करण्याची प्रक्रिया करण्यात आली नाही. यावेळी भाजपचे 3D हॅंग झाले का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केला. हे आकडे का कमी झाले हे सरकारला सांगावे लागेल. कोणतीही व्यक्ती जी भारतीय नागरिक नसेल त्याची चौकशी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हे महाराष्ट्र राज्यात होत असते. यात कोणीही टोकण्याचे काम करत नाही. यावर काही नेते प्रश्न करत आहेत. यावर सरकारने आधी ही संख्या का कमी झाली याचा खुलासा करावा. आपली 3D वेबसाईट बंद होती का, असाही प्रश्न त्यांनी विचारला.

भाजप व शिवसेना निवडणुकांच्या दरम्यान असे प्रश्न तयार करतात. परंतु मुंबई पोलीस नेहमी अशा लोकांच्या कायदेशीर चौकशी करून त्यांना हद्दपार करण्याचे काम चोख पार पाडतात. १९९५ दरम्यान निवडणुकीच्या अगोदर मा. बाळासाहेब ठाकरे यांनीही अशी आकडेवारी दिली होती. पण त्यावरून देखील भ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांचे सरकार आले व त्यावेळेस सुद्धा अशी आकडेवारी फेकण्यात येत होती. फक्त प्रसिद्धीकरिता हे करत असाल तर यात काही खोट आहे असे वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. जे लोक बांग्लादेशच्या नावावर आवाज उठवत आहेत त्यांनी एक गोष्ट विचारात घ्यावी की १९७१ च्या अगोदर ज्या लोकांचे नागरिकत्व आपण स्वीकारले. जन्माच्या आधारावर १९७७ नंतर कोणतीही विदेशी नागरिकांची संतान भारतात जन्म घेईल ती भारतीय नागरिक आहे. जे एनसीआर चे ४० लाखाचे आकडे समोर आले आहेत त्यात तपासणी केली तर याचा आकडा २-४ लाखाहून अधिक जाऊ शकणार नाही. मोदी सरकारने या गोष्टीबाबत विदेशी सरकारशी बोलण केले का? विदेशी मंत्रालयात हा विषय मोदी सरकारकडून ठेवण्यात आला का? बांग्लादेशातील सरकारशी यावर चर्चा झाली का? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. यावरून हेच कळते की मोदी सरकार निवडणुकीदरम्यान पुन्हा धर्माच्या नावावर वाद निर्माण करत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संबंधित लेख