डिजीटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी – शशिकांत शिंदे

10 Jul 2018 , 10:32:41 PM

राज्यातील १३ हजार ८४४ शाळांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. ४४ हजार ३३० शाळांतील विद्यार्थ्यांना संगणक म्हणजे काय हेच माहिती नसल्याची शोकांतिका आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहात मांडली. शाळांमध्ये डिजीटल क्लासरुम असावी अशी जनतेची मागणी आहे. पण यासाठी निधी अपुरा पडत आहे. याआधी केंद्रातून पैसे येत होते पण आता ते येणे बंद झाल्याचे कटू सत्य शिंदे यांनी सभागृहात सांगितले. परिस्थिती वाईट आहे. डिजीटल क्लासरूमसाठी बजेटमध्ये तरतूद करावी अशी मागणी त्यांनी केली. या शाळांना पुरेसा विद्युत पुरवठा नाही. एमएसईबी या शाळांना वीजेचे खासगी दर लावत आहे. शाळांसाठी विद्युत पुरवठा नीट करावा, वीजदर कमी करावेत व निधी वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आग्रही मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.

संबंधित लेख