वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभ मुंबईत संपन्न

02 Jul 2018 , 06:26:28 PM

वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण समारंभामध्ये कृषी, कृषिप्रक्रिया, कृषी साहित्य, कृषी पत्रकारिता, निर्यात, फलोत्पादन, भाजीपाला, फुलशेती, दुग्धव्यवसाय, पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील शेतकरी आणि संस्थांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते मुंबईत रविवारी झाला. याप्रसंगी प्रतिष्ठानचे श्री. राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष श्री. अविनाश नाईक, सचिव ॲड. विनयकुमार पटवर्धन आणि कोषाध्यक्ष डॉ. बकुळ पटेल तसेच निलय नाईक, डॉ. एन. पी. हिराणी उपस्थित होते.

संबंधित लेख